कोयत्याने वार करत `त्याची` हत्या करणारे चौघजण...

Crime1.jpg
Crime1.jpg

किरकटवाडी (पुणे) : शेतातील रस्त्याच्या वादावरून मुळशी तालुक्यातील सांदवघर या गावातील एकाची   कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. भाऊ सामा मरगळे (वय 35, रा. तव, ता. मुळशी) असे मृताचे नाव असून याप्रकरणी वेगाने तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने किरकटवाडी (ता. हवेली) येथून डोंगरावर लपलेल्या चार आरोपींना घटना घडल्यापासून चार तासांतच अटक केली आहे.

गणेश रामभाऊ मरगळे( वय 23 वर्षे रा. किरकिटवाडी ता. हवेली जि. पुणे), राजू ज्ञानोबा मरगळे (वय 19 वर्षे रा. तव ता. मुळशी जि. पुणे), विजय बाबुराव मरगळे (वय 22 वर्षे रा. तव  ता. मुळशी जि.पुणे), सुनिल रामभाऊ मरगळे (वय 20 वर्षे रा. तव ता.मुळशी जि. पुणे) या चार आरोपींना खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे किरकटवाडीतील करंजावणे वस्ती जवळ असलेल्या डोंगरावरून अटक करण्यात आली आहे.
 

वरील आरोपींनी सदर  गुन्हा केल्याची कबुली दिली असून आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी पौड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 
पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलिस हवालदार रौफ इनामदार, मुकुंद आयचीत, पोलिस नाईक गुरू जाधव, विजय कांचन, लियाकत मुजावर, पोलिस शिपाई अमोल शेडगे, मंगेश भगत, सुधीर अहिवळे, धिरज जाधव यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com