सहा महिन्यांचे बाळ कडेवर, दोन मुले, दोन मुली आणि संसाराचे पोतभर ओझे डोक्‍यावर घेतलेला बाप

Police
Police

४०५ कुटुंबांना आधार ; २५ हजार परप्रांतीयांना पोचविले सुखरुप घरी
पुणे - सहा महिन्यांचे बाळ कडेवर घेऊन निघालेली एक आई, तिच्या बरोबर दमलेल्या अवस्थेतच पाठीवर सॅक, पिशवीसह जड पावलांनी चालणारी पाच-सहा वर्षांची दोन मुले, डोईवर गाठोडी घेतलेल्या दोन मुली आणि संसाराचे पोतभर ओझे डोक्‍यावर घेतलेला बाप. खराडी येथून पायी बालेवाडीला व तेथून झारखंडला निघाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येरवड्याजवळील अंधाऱ्या रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या या कुटुंबाला पाहून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची गाडी थांबली. कामगार कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत गाडीकडे पाहू लागले. गाडीतून पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे उतरले. "तुम्ही लेकराबाळांना घेऊन पायी जाऊ नका, जेवण घ्या, आराम करा, आम्ही तुमच्या जाण्याची व्यवस्था करतो'', अशी विनंती केली. या प्रसंगाने गहिवरलेल्या पती-पत्नीनेही त्यांना हात जोडले.

या पद्धतीने गावाकडे निघालेल्या ४०५ कामगार कुटुंबांना पोलिस आयुक्तांपासून ते पोलिस उपायुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी आसरा अन्‌ आधार देत त्यांची पाठवणी केली. संवेदनशील पोलिसांनी २५ हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी सुखरुप पोचविण्यासाठी मदतीचा हात दिला. राज्यातील व परराज्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना पोलिस  परवानगी देत आहेत. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्यासह अतिरीक्त पोलिस आयुक्त, उपायुक्त यांची टिम रात्रंदिवस लोकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी धडपडत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com