

पुणे: आलिशान कारमधून येत येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तरुणांनी शुक्रवारी रात्रभर कोरेगाव पार्क मुंढवा रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केली. तेथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे.