crime
Esakal
शिरूर - तालुक्यातील करडे घाटात झालेल्या अंदाधूंद गोळीबार प्रकरणानंतर अलर्ट झालेल्या पोलिस दलाने शहर व परिसरातील अनेक नामचीन गुंडांची धरपकड सुरू केली असून, काल रात्रीपासून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, करडे घाट गोळीबार व खूनप्रकरणी पहाटे सहाजणांना अटक करण्यात आली असली; तरी या हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.