Pune Police : हरवलेले १७१ मोबाईल परत मिळवून हडपसर पोलिसांच्या कृतीने नागरिक भारावले!

Lost Mobile Recovery : हडपसर पोलिसांनी १७१ हरवलेले किंवा चोरीचे मोबाईल त्यांच्या मालकांना परत केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला.
Pune police return 171 lost mobiles citizen trust strengthened

Pune police return 171 lost mobiles citizen trust strengthened

Sakal

Updated on

हडपसर : जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल गहाळ झाला की माणूस अस्वस्थ होतो. पोलिसांनी परिसरातील अशा १७१ नागरिकांना हे मोबाईल परत मिळवून देत त्यांची ही अस्वस्थता दूर केली. मोबाईल परत मिळण्याची आशा सोडून दिलेली असतानाच ते सन्मानपूर्वक परत केल्याच्या पोलिसांच्या कृतीने नागरिक भारावून गेले होते. पोलिस परिमंडळ ५ अंतर्गत सात पोलिसठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या अथवा चोरिला गेलेल्या व पोलिसांनी शोधून ताब्यात घेतलेले मोबाईल पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल हातात आल्यावर अनेकांच्या डोळ्यांत पाणी उतरले होते. पोलिसांनी दिलेल्या विश्वासामुळे उपस्थित भारावून गेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com