Pune : पोलीस स्मृती दिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : पोलीस स्मृती दिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

हडपसर : येथील शटलमास्टर्स बॅडमिंटन अकादमीच्या वतीने पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

पोलीस दलातील पुरुष व महिलांसाठी एकेरी व दुहेरी सामने यावेळी खेळवण्यात आले. या सामन्यांमध्ये क्विक रिस्पॉन्स टीमच्या विक्रम मिसाळने चार सुवर्ण, बीडीडीएस पुणेच्या मेघराज जाधवने तीन सुवर्ण तर पोलीस मुख्यालयातील पल्लवी झुरुंगे हिने दोन सुवर्णपदके जिंकली. अकादमीच्या अंजली लोटके व अमोल करमळकर यांनी संयोजन केले होते. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

पुरूष स्पर्धेमध्ये मेघराज जाधव, विक्रम मिसाळ, मंगेश जगताप, अविनाश शेवाळे विजेता तरअवधूत उकरंडे, अंकुश गंधले, अर्जुन कुडाळकर, राजेश पवार, विलास सरवडे, संजय मोगले, राहुल जोग, दीपक गंधले उपविजेता ठरले आहेत.

महिलां स्पर्धेमध्ये नम्रता पाटील, पल्लवी झुरुंगे, गीतांजली जांभुळकर विजेत्या तर स्वप्ना वाघमारे, हर्षा चांदगुडे, रेश्मा पाटील उपविजेत्या ठरलेल्या आहेत.

टॅग्स :Pune NewspuneBadminton