esakal | पोलिस अधिकाऱ्यानेच नियंत्रण कक्षात फोन करून दिला आत्मदहनाचा इशाराIPune
sakal

बोलून बातमी शोधा

Police

पोलिस अधिकाऱ्यानेच नियंत्रण कक्षात फोन करून दिला आत्मदहनाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सतत बदली होत असल्यामुळे एका पोलिस अधिकाऱ्यानेच स्वतः नियंत्रण कक्षाला फोन करून आत्मदहन करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस दलात चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधीत पोलिस अधिकाऱ्याचे मनपरिवर्तन केले.

संबंधीत पोलिस अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणामुळे मागील काही दिवसात दोन ते तीन वेळा बदरी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी त्रस्त झाला होता. दरम्यान, गुरूवारी सकाळी त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. आपली सातत्याने बदली होत असल्याने आपण त्रस्त झालो आहोत, त्यातूनच आत्मदहन करणार असल्याचे त्याने नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले. नियंत्रण कक्षाने यासंदर्भातील माहिती तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनीही वेळ न घालविता संबंधित पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी त्याचे समुपदेशन केले. तसेच असा प्रकार पुन्हा न करण्याची ताकीदही दिली. त्याचबरोबर नोटीसही बजावली.

loading image
go to top