..लेकिन गलत को सही करनेसे फर्क पडता है; बदली होताच पोलीस अधिकाऱ्याचे स्टेटस् | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Police

..लेकिन गलत को सही करनेसे फर्क पडता है; बदली होताच पोलीस अधिकाऱ्याचे स्टेटस्

पुणे - पुणे पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची नुकतीच बदली करण्यात आली. मात्र पुराणिक यांचा काही लोकांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका महिलेने महिला आयोगामध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर पुराणिक यांची बदल करण्यात आली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्स ॲपला ठेवलेलं स्टेटस् चर्चेत आलं आहे.

हेही वाचा: बारामतीकर डॉ. धनंजय घनवट यांना मुख्यमंत्री विशेष सेवा पदक

राजेश पुराणिक यांची आज बदली करण्यात आली होती. पुराणिक हे सामाजिक सुरक्षा विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र आज त्यांना हटवून नवीन अधिकाऱ्याला ही जबाबदारी देण्यात आली

पुराणिक यांचा काही लोकांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका महिलेने महिला आयोगामध्ये तक्रार दिली होती. याप्रकरणी योग्य तो तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले होते.

हेही वाचा: शिंदे गटाला कमी निधी मिळालाय; भाजपवर राष्ट्रवादीचा पलटवार

आज बदली झाल्यानंतर, त्यांनी व्हॉट्स ॲपला स्टेटस् ठेवलं होतं. "सर यहा कुछ ऑफिसर्स हे जो इमानदारी से अपनी ड्युटी करना चाहते है, लेकिन हमराही डिपार्टमेंट हमारी कोसने पर लगा हुवा है" "गलत क्या है ये जानने से कोई फरक नही पडता, लेकिन गलत को सही करनेसे फर्क पडता है", असं स्टेट्स त्यांनी ठेवलं. तसेच त्यांनी अभिनेता अजय देवगन यांचा सुप्रसिद्ध चित्रपट सिंघम मधील एका दृश्याची लिंक देखील त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वर ठेवली आहे. त्यामुळे पोलिस दलात त्यांच्या व्हॉट्स ॲप स्टेट्सची चर्चा सुरू आहे.

Web Title: Police Officer Rajesh Puranik Whats App Status After Transfer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social Media