Crime
Sakal
पुणे - कैद्यांना सुनावणीसाठी येरवडा कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात नेणाता कैद्यांच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही’, असे म्हणत त्याने सहकारी पोलिस कर्मचाऱ्याला दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची गंभीर दखल घेत धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिले.