आईने केली सुचना...अन् मग त्या पोलिस अधिकाऱ्याने लगेच...

राजकुमार  थोरात
Sunday, 7 June 2020

आईच्या सुचनेवरुन पोलिस अधिकाऱ्याने संपूर्ण गावात वाटली रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे व मास्क.

वालचंदनगर : संपूर्ण राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये राज्याचे पोलिस दल जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावरच ड्युटी करत आहेत. इंदापूर तालुक्यातील बोरी हे गाव असणाऱ्या व सोलापूर शहरामध्ये पोलिस खात्यातील गुन्हे शाखेमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या संजय जगताप हे साेलापूर शहरामध्ये कोरोनापासुन नागरिकांचा बचाव करण्यासाठी अविरत कार्यरत आहेत. जगताप यांनी आईच्या सुचनेवरुन संपूर्ण गावातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व कोरोनाचा होणारा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आख्या गावातील सुमारे ८ हजार नागरिकांना  अर्सेनिक अल्बम-३० औषध व मास्क वाटप केले.

काम देत का कुणी काम : ओझी उचलू, कुठेही राबू पण...

इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील संजय जगताप हे सोलापूर शहरातील पोलिस दलातील गुन्हे शाखेमध्ये  वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे. सोलापूर शहरामध्ये कोराेना ने हाहाकार माजवल्यामुळे  नागरिकांच्या सोईसाठी जगताप हे गेल्या तीन महिन्यापासुन अविरत कार्यरत आहेत.

गेल्या आठ दिवसापूर्वी जगताप हे सोलापूर हून पुण्याला जाताना आई भामाबाई साठी अर्सेनिक अल्बम-३०  रोगप्रतिकारशक्ती वाढीच्या गोळ्या घेवून आले होते. यावेळी भामाबाई  यांनी या गोळ्या सर्वांनी खालल्या तरी चालतील का ? अशा प्रश्‍न करुन सर्वासाठी गोळ्या आण्याची मागणी केल्यानंतर जगताप यांनी संपूर्ण गावातील सुमारे  आठ हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० गोळ्या व मास्क वाटप करण्याचा निर्धार करुन संपूर्ण गावालाच गोळ्या वाटप सुरु करुन गावाची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम सुरु केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वितरणासाठी संजय जगताप यांचे बंधू प्राथमिक शिक्षक दादासाहेब जगताप व ग्रीन केअर अॅग्रो कंपनीचे मालक अनिल जगताप हे ही मदत करीत आहेत. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते  गोळ्या व मास्क वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपतीचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील , सरपंच संदीप ठोंबरे,गणेश झगडे, रामचंद्र शिंदे, डॉ.रविंद्र शिंदे उपस्थित होते.

कार्यक्षम पोलिस अधिकारी- संजय जगताप यांनी १९९९ साली गडचिरोली येथे पोलिस खात्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेस सुरुवात केली असून उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच १५ ऑगस्ट २०१९ ला भारत सरकारचे आंतरिक सुरक्षा पदकाचे मानकरी ठरले.तसेच  १ मे २०२० ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून कोराेनाच्या महामारीमध्ये त्यांचे अविरत काम सुरु आहे. कार्यक्षम अधिकारी म्हणून सोलापूरमध्ये कार्यरत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officers distributed anti-immune drugs and masks throughout the village