Video : काम देत का कुणी काम?; ओझी उचलू, कुठेही राबू पण...

baramati12.jpg
baramati12.jpg

बारामती (पुणे) : आम्हाला ओझी उचलायच असो किंवा शेतात राबायचे असो...काहीही काम द्या...पण हाताला काहीतरी काम द्या नाहीतर आमची उपासमार होईल...घरात बसलो की कुटुंबिय आवश्यक सामानाची यादी देतात, ते खरेदी करायला पैसे लागतात आणि गेल्या 80 दिवसांपासून काही कमाईच नाही...कुटुंब कस चालवायचं या काळजीने आता डोळ्यापुढ अंधारी यायला लागलीय..... बारामतीतील रिक्षाचालक आपल्या व्यथा व्याकुळ होऊन मांडत आहेत.

कोरोनाच्या संकटाने सगळ्यांच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय, तिथे रिक्षाचालक कसे वेगळे राहतील. एकीकडे काढलेल्या कर्जाचे हप्ते डोक्यावर, दुसरीकडे कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायची विवंचना...हातात पैसेच येईनात तर काय करायच हेच अनेकांना समजेनास झालय. एकीकडे बससेवा सुरु केलीय पण प्रवासी नसल्याने बससेवाही बंद पडलीय.

;

जो वर शाळा महाविद्यालयांसह बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु होत नाही तो वर रिक्षाचालकांचेही भवितव्य अंधारातच असेल, असे येथे उपस्थित रिक्षाचालक मनोज शितोळे, नितीन श्रीखंडे, विजय साबळे, प्रमोद चव्हाण, सागर सोनवणे, मनोज साबळे, नितीन खडके यांनी सांगितले. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काहीतरी मदत करा....किमान बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु करा अशी आर्जवी मागणी रिक्षाचालकांची आहे. करसवलतीसह विम्याच्या रकमा माफ करा, अन्नधान्याचा पुरवठा करा, सानुग्रह अनुदान द्या अन्यथा जगणे मुश्किल होईल, अशी व्यथा या रिक्षाचालकांनी मांडली. गेल्या तीन महिन्यांपासून हातात पैसेच येत नाहीत, दुसरीकडे खर्च तर सुरुच आहेत. सध्या आम्ही कोणतेही काम करायला तयार आहोत, पण कामच मिळेनास झालय...रिक्षा सुरु करायला सरकारने परवानगी दिलीय. खरी पण प्रवासीच नाही तर रिक्षा कशा चालवायच्या हे समजत नाही. प्रवाशांअभावी बससेवाही बंद आहे मग आमचा प्रपंच कसा चालणार हे समजेनास झालय अस अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रिक्षाचालकांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com