पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; रॅलीला परवानगी नाकारली

टीम ई-सकाळ
Saturday, 8 February 2020

मनसेकडून आज राजगर्जना मोटारसायकल फेरी काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. फेरीचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून करण्यात येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आज शहरात दुचाकी फेरी काढण्यात येणार होती. पण, त्या फेरीला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, शहातील नारायण पेठ पोलिस चौकीत मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोटारसायकल फेरी काढण्याची घोषणा मनसेनं केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनसेकडून आज राजगर्जना मोटारसायकल फेरी काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. फेरीचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून करण्यात येणार आहे. या फेरीत अंदाजे पाच हजार मनसेचे कार्यकर्ते सहभागी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळं शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी या फेरीला परवानगी नाकारली आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होतील, अशी शक्यता मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे. पण, फेरीमुळं वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यास नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पोलिसांनी फेरीला परवानगी दिलेली नाही. 

आणखी वाचा - चीनमधून तरुण नाशिकमध्ये परतला; त्याला झालीय सर्दी

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मनसे कार्यकर्ते फेरी काढण्यावर ठाम आहेत. उद्या (9 फेब्रुवारी) मुंबईत मनसेचा मोर्चा आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची पुण्यातूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्या मोर्चापूर्वी आज, पुण्यात तयारी बरोबरच, कायद्याविषयी जनजागृतीसाठी मोटारसायक रॅली काढण्यात येणार होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police permission denied to mns rally workers detained