बापरे! "हा" चीनमधून आलाय तर...अन्...

नरेश हळणोर : सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

द्वारका परिसरात राहणारा संबंधित 31 वर्षीय तरुण शांघाय येथे गेला होता. गेल्या 12 जानेवारीस तो मुंबईमार्गे नाशिकमध्ये आला. त्यानंतर गेल्या 30 जानेवारीपासून त्याला सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होऊ लागला. वातावरणातील बदलांमुळे त्रास होत असल्याने तो स्थानिक रुग्णालयात गेला. मात्र...

नाशिक : जानेवारीत पर्यटनानिमित्ताने शांघाय (चीन) येथे गेलेला युवक नाशिकमध्ये परतला आहे. मात्र, गेल्या आठवड्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त झाल्याने कोरोनासदृश आजाराची शक्‍यता गृहित धरून जिल्हा रुग्णालयातील विशेष विभागात त्याची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र, त्यास साधा सर्दी-खोकला असल्याचे निदान झाले आहे. 

त्याला सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास
द्वारका परिसरात राहणारा संबंधित 31 वर्षीय तरुण शांघाय येथे गेला होता. गेल्या 12 जानेवारीस तो मुंबईमार्गे नाशिकमध्ये आला. त्यानंतर गेल्या 30 जानेवारीपासून त्याला सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होऊ लागला. वातावरणातील बदलांमुळे त्रास होत असल्याने तो स्थानिक रुग्णालयात गेला. मात्र, मागील काही दिवसांतील प्रवासाची माहिती घेतल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आले. त्यानुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हा रुग्णालयातील विशेष विभागात शुक्रवारी (ता. 7) त्याची तपासणी करण्यात आली. 

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​

कोरोनासदृशतेच्या शक्‍यतेने घेतली आरोग्याची चाचणी ​
दरम्यान, हा तरुण चीनमध्ये शांघाय परिसरात वास्तव्याला असतानाच्या काळात तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. तसेच तो भारतात दाखल होऊनही तीन आठवडे उलटले आहेत. त्यामुळे त्यास कोरोनासदृश विषाणूंची लागण होण्याची शक्‍यता नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही विशेष पथकाकडून काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.  

हेही वाचा > PHOTOS : बहिण-भावाची भेट होण्यापूर्वीच मोठा आक्रोश... ह्रदय पिळवटून टाकणारी घटना.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man who returned from China Investigation of corona virus nashik marathi news