esakal | पुणे जिल्ह्यात सिंघमने अवैध व्यवसायांवर फास आवळला; बारामतीमध्ये मोठी कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यात सिंघमने अवैध व्यवसायांवर फास आवळला; बारामतीमध्ये मोठी कारवाई

शहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत सात जणांवर कारवाई केली.

पुणे जिल्ह्यात सिंघमने अवैध व्यवसायांवर फास आवळला; बारामतीमध्ये मोठी कारवाई

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत सात जणांवर कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकपदीशहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत सात जणांवर कारवाई केली. यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर फास आवळला आहे. आज बारामतीतही ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व पोलिस पथकाने नीरज ऑनलाईन लॉटरी सेंटर व दीक्षित ऑनलाईन लॉटरी सेंटर (श्रीराम गल्ली) स्वामी समर्थ स्कील गेम लॉटरी सेंटर व स्कील गेम 2020 लॉटरी सेंटर (भाजी मंडई) तसेच  राजश्री लॉटरी सेंटर (खंडोबा नगर) येथे छापे टाकले. या ठिकाणी विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या माध्यमातून जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांना दिसले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सेंटर्सवरुन ऑनलाईन जुगाराची साधने, संगणक संच, प्रिंटर, वायफाय राऊटर, कागदी चिठ्या, मोबाईल फोन, रोख रक्कम असा 3 लाख 63 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  बेकायदेशीर ऑनलाईन जुगार चालवणारे तुषार माणिक लोंढे व संकेत पुरुषोत्तम दीक्षित (रा. कोष्टी गल्ली बारामती), सुनील अण्णा लष्कर (रा.कुरवली रोड फलटण), हेमंत देशमुख (रा. निरगुडी ता. फलटण), मनोज बबन सोनवले व सतीश विठ्ठल सूर्यवंशी (रा. शंकर भोई तालीम नजिक, बारामती), गोपाल राधाकिशन शर्मा (रा. देसाई इस्टेट बारामती) यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल गोरे, शिवाजी ननावरे, साहय्यक फौजदार राजेंद्र थोरात, श्रीकांत माळी, हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, रौफ इनामदार, ज्ञानदेव क्षीरसागर, काशिनाथ राजापुरे, प्रवीण मोरे, प्रसन्नजीत घाडगे यांनी ही कारवाई केली आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)