raid on illegal call center
sakal
पुणे - अमेरिकन नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मगरपट्टा रस्त्यावरील अनधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मुख्य चालक-मालकांसह ३२ जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने केलेल्या या कारवाईत बुधवारी (ता. ३०) मार्वल फिगो इमारतीमधील तीन कार्यालयांमधून १५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.