Pune Police : पुणे पोलिसांनी हरविलेले ४०२ मोबाईल मालकांकडे सुपूर्द; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

Mobile Recovery : पुणे पोलिसांनी परिमंडळ एक आणि चारमधील एकूण ४०२ हरविलेले मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत केले. या उपक्रमामुळे मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा आणि आठवणी परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Pune Police Recover 402 Lost Mobile Phones Across Two Divisions

Pune Police Recover 402 Lost Mobile Phones Across Two Divisions

Sakal

Updated on

पुणे : शहरात हरविलेले मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत करण्याच्या पुणे पोलिसांच्या उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. परिमंडळ चारच्या कार्यक्षेत्रातून हरविलेले २०९ मोबाईल आणि परिमंडळ एकमधील १९३ मोबाईल असे एकूण ४०२ मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. येरवडा पोलिस ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. पोलिसांनी ‘सीइआयआर’ आणि ‘लॉस्ट ॲण्ड फाउंड’ पोर्टलवरील तक्रारींची पडताळणी करून मोबाईल जप्त करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com