Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रेशर मिड आणि प्लाझ्माच्या वापराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कारवाईचा उगारला बडगा.
police crime on sound systems in pune city

police crime on sound systems in pune city

sakal

Updated on

पुणे - मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रेशर मिड आणि प्लाझ्माच्या वापराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी शहरातील विविध भागांत झालेल्या मिरवणुकांमध्ये सहा ठिकाणी डीजे ऑपरेटरकडून प्रेशर मिड आणि प्लाझ्माचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com