
पुणे : हडपसर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार कोयते जप्त करण्यात आले आहे. एका अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने कोयते लपविण्यात आले होते, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईला सहआरोपी केले आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.