#PunePolice  : पोलिसांनो, नम्र व्हा! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नागरिकांची अपेक्षा; नाते दृढ होत असल्याचा सर्वेक्षणातील निष्कर्ष 
पोलिस आणि नागरिकांमधील नाते दृढ होत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एखादा गुन्हा वा अन्य काही बाबींसाठी पोलिसांना कायमच सहकार्य करण्याची भूमिका अनेक नागरिकांनी व्यक्त करतानाच, पोलिसांनी नागरिकांशी नम्रतेने वागावे, अपघात किंवा गुन्ह्याच्या ठिकाणी तत्काळ पोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

पुणे : पोलिस आणि नागरिकांमधील नाते दृढ होत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एखादा गुन्हा वा अन्य काही बाबींसाठी पोलिसांना कायमच सहकार्य करण्याची भूमिका अनेक नागरिकांनी व्यक्त करतानाच, पोलिसांनी नागरिकांशी नम्रतेने वागावे, अपघात किंवा गुन्ह्याच्या ठिकाणी तत्काळ पोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

असे केले सर्वेक्षण 
सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍सच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात 180 विद्यार्थी व सात शिक्षक सहभागी झाले होते. शहरातील 2332 नागरिकांकडून प्रश्‍नावली भरून घेण्यात आली. त्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, गृहिणींचा समावेश होता. 

पोलिसांकडून नागरिकांच्या अपेक्षा (टक्केवारी) 
- प्रश्‍नांचा भडिमार न करता तक्रारी शांतपणे ऐकाव्यात ः 45 
- लोकांना सुरक्षित व आश्‍वस्त वाटेल असे वागावे ः 50 
- विनयशील आणि नम्र असावे ः 48 
- चोरी, अपघाताच्या ठिकाणी तत्काळ पोचावे ः 56 

पोलिसांच्या भूमिकेबद्दल जागरूकता ः 77 टक्के 
- कायद्याची अंमलबजावणी 
- सामाजिक सुरक्षितता देणे 
- गुन्हेगारांना शिक्षा करणे 
- नागरिकांना मदत करणे 

सहकार्याची तयारी ः 70 टक्के 
- पोलिसांशी संवाद साधताना लिंगभेद (महिला, पुरुष) महत्त्वाचा वाटतो 
- पीडित म्हणून मला पोलिसांकडे जाण्यास भीती वाटत नाही 
- साक्षीदार म्हणून पोलिसांकडे जाण्यास आनंद वाटेल 
- एखाद्या दुर्घटनेच्या वेळी जबाबदार नागरिक म्हणून पोलिसांकडे तक्रार करेन 
- एखाद्या दुर्घटनेच्या वेळी पोलिसांची तातडीने मदत घेईन 

गरजेच्या वेळी उपलब्धता ः 62 टक्के 
- गरजेच्या वेळी पोलिस नागरिकांना सहज उपलब्ध होतात 
- माझ्या कुटुंबातील महिलेला पुरुषाच्या सुरक्षेशिवाय पोलिस ठाण्यात पाठविण्याची भीती वाटत नाही 

पोलिसांची सकारात्मक वागणूक ः 62 टक्के 
- स्वयंप्रेरित 
- प्रामाणिकता 
- काळजी व सहानुभूती 

सदैव जागरूकता ः 67 टक्के 
- पोलिसांच्या सहवासात नागरिकांना सुरक्षित वाटते 
- गेल्या पाच वर्षांत पोलिसांच्या कामात प्रगती 
- महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिस सतर्क असतात 
- ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात नेहमीच सतर्कता 

"खाकी'चा धाक सर्वांनाच वाटला पाहिजे. मात्र, पोलिसांनी सर्वांबरोबर नम्रतेनेही वागले पाहिजे. याबाबत आपल्या काय अपेक्षा आहेत? आम्हाला WhatsApp करा 9130088459 वर किंवा ई-मेल करा Webeditor@esakal.com 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police should treat civilians politely