Pune News : औंधमध्ये पोलिस उपनिरीक्षकाने संपविले जीवन; राहत्या घरी शासकीय पिस्तुलातून झाडली गोळी

पुणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने औंधमधील राहत्या घरी शासकीय पिस्तुलातून गोळी झाडून जीवन संपविल्याची घटना घडली.
Police Sub Inspector Ends Life in Aundh Shoots Self with Service Pistol

Police Sub Inspector Ends Life in Aundh Shoots Self with Service Pistol

sakal

Updated on: 

पुणे - पुणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने औंधमधील राहत्या घरी शासकीय पिस्तुलातून गोळी झाडून जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता. ७) दुपारी घडली.

नीलेश भाऊसाहेब पाटील (वय-५५, रा. नागरस रस्ता, औंध) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. पुणे पोलिस दलात भरती झाल्यानंतर पदोन्नतीने ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते. बुधवारी उच्च न्यायालयातील कामासाठी त्यांना मुंबईला जायचे होते. मात्र, ते मुंबईला गेले नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com