थरथरत्या हातांना वर्दीचा आधार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

मेसेज वाचून डबडबले डोळे
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांना एक मेसेज येतो, ‘मी निवृत्त लष्करी अधिकारी रिपुसुदान कुमार सिन्हा. मी कर्करोगाने ग्रस्त असून घरी एकटाच आहे. माझी औषधे संपली आहेत.मला मदत करा’. हा मेसेज वाचून साठे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. अनेक अडचणी पार केल्यानंतर औषधे मिळाली. पोलिसांनी सिन्हा यांना ती घरी नेऊन दिली. पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सिन्हा यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

पुणे पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात तब्बल सव्वापाचशेहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मदत करीत आधार दिला आहे.

पुणे शहरात ५ ते ६ लाख वृद्ध नागरीक आहेत. त्यामध्ये ५ ते ७ हजार एकाकी आहेत. लॉकडाउनच्या काळात त्यातील अनेकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यांना मदत करण्याची इच्छा असूनही केवळ शहरात संचार मनाई आदेश असल्याने अनेकांना याबाबत मर्यादा येत होत्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोणाची औषधे संपली, तर कोणाच्या घरी केअर टेकर येऊ शकत नसल्याने त्यांची तारांबळ होऊ लागली होती. काही एकाकी वृद्धांना जेवण मिळत नव्हते, तर काही जणांना नियमित औषधोपचार घेण्यासाठी रुग्णालयात जायचे होते. मात्र संचारमनाईमुळे त्यांना त्यांची कामे करण्यास अनेक अडचणी येत होत्या. अशा संकटाच्या काळात वृद्ध नागरीकांनी थेट पोलिसांना संपर्क करुन कैफियत मांडली. 

दिलासादायक : पुण्यातील एकाच सोसायटीतील `एवढ्या` जणांचे कोरोना रिपोर्ट...

दरम्यान, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी दिले होते. त्यानुसार, पोलिसांच्या भरोसा सेल अंतर्गत येणारे ज्येष्ठ नागरिक कक्ष व सर्व पोलिस ठाण्याच्या कक्षेतील वृद्धांना मदत करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. पोलिसांकडे तब्बल ५३४ ज्येष्ठ नागरीकांनी संपर्क साधला. या सर्व गरजूंना ज्येष्ठ नागरिक कक्षाने स्थानिक पोलिस ठाणे व सामाजिक संस्था यांच्या मदतीने सर्व प्रकारची मदत पोचविण्याचे काम केले. त्यामध्ये सर्वाधिक ७३ जणांनी जेवण व अन्नधान्यासाठी पोलिसांकडे संपर्क साधला.

दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नईसह ८ शहरांसाठी पुण्याहून 'असे' आहे एअर फेअर

लॉकडाउन काळात पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला. या सर्व गरजूंना ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या माध्यमातून स्थानिक पोलिस ठाणे व सामाजिक संस्था यांच्या मदतीने सर्व प्रकारची मदत पोचविण्याचे काम केले.
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police support to old people humanity initiative