दिलासादायक : पुण्यातील एकाच सोसायटीतील `एवढ्या` जणांचे कोरोना रिपोर्ट...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

सोमनाथनगर वडगावशेरी येथील गार्डेनिया सोसायटी फेज एकमधील हे सर्व रहिवाशी होते. त्यामुळे सोसायटीच्या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

रामवाडी (पुणे) : कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या बावीस जणांचे स्वॅब शुक्रवारी (ता. 22 ) तपासणासाठी नेण्यात आले होते. सोमनाथनगर वडगावशेरी येथील गार्डेनिया सोसायटी फेज एकमधील हे सर्व रहिवाशी होते. त्यामुळे सोसायटीच्या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

भारतीय शास्त्रज्ञांची कमाल; तयार केला विषाणू नष्ट करणार मास्क; एवढी आहे किंमत

अखेर त्या २२ जणांचे कोरोना रिपोर्ट् निगेटिव्ह आल्याने प्रत्येकांनी सुटकेचा श्वास घेतला. घरी परतलेल्या या बावीस जणांचे थाळी तसेच टाळ्या वाजवत स्वागत करण्यात आले. मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाले तेव्हापासून एक ही कोरोना रुग्ण न आढळलेल्या 175 सदनिका असलेल्या गार्डेनिया सोसायटी फेज वन मध्ये आई व मुलगा या दोघांना कोरोनाची लागण झाली होती.

वडिलांना सायकलवरून घेऊन जाणाऱ्या ज्योतीने फेटाळला क्रीडामंत्र्यांचा प्रस्ताव

सदर महिला या ससून रुग्णालयात कार्यरत आहे. तर त्यांचा मुलगाही कोरोना बाधित आहे. त्या मुलाच्या संपर्कात आलेल्या बावीस जणांची स्वॅब तपासणी खराडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात करण्यात आली होती. यामुळे या बावीस व्यक्तींचे रिपोर्ट् काय येईल या काळजीने सोसायटीतील रहिवाशी चिंताग्रस्त  झाले  होते. सर्वांचे रिपोर्ट् निगेटिव्ह आल्याने सोसायटीच्या रहिवाशांनी व्हाट्सअॅपद्वारे शाब्दिक आनंद व्यक्त केला 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बावीस जणांचे रिपोर्ट् निगेटिव्ह आले आहेत. तरी ही या सर्वांनी सुरक्षितेच्या दृष्टीने चौदा दिवस घराबाहेर न पडता स्वतःच्या घरात बसून राहायचे आहे.

-राजेश बनकर,  सहायक आयुक्त, नगररोड क्षेत्रीय कार्यालय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 person not affected by corona in pune