पुणे - भारतात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून पुण्यातील कोंढवा परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांवर कोंढवा पोलिसांनी अटकेची कारवाई केली. संबंधित बांग्लादेशी नागरिक मागील चार महिन्यांपासून कोंढवा परिसरामध्ये बेकायदा वास्तव्य करत होते.