वाळू चोरी करून ट्रकमधून निघाले...पोलिसांनी असा रचला सापळा

police.
police.
Updated on

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात भर पावसात वाळू चोरी जोमात सुरू आहे. त्यावर पोलिस उप अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून १२ लाख ३० हजार रूपयांचा एेवज जप्त करून चार जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 

दौंडच्या उप अधीक्षक (आयपीएस) एेश्वर्या शर्मा यांना १८ जून रोजी दौंड- पाटस रस्त्यावर बेटवाडी हद्दीत वाळू चोरी व चोरलेल्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी उप निरीक्षक नितीन मोहिते, काॅन्स्टेबल रवी काळे व महेश पवार यांना कारवाईचे आदेश दिले. वाळू चोरी करून त्याची वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम.एच. ४२ ए.क्यू. ७९३२) बेटवाडी येथे अडविण्यात आला. या ट्रकचा चालक सुरेश मोतीराम राठोड (रा. सोनवडी, ता. दौंड) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने ट्रक मालक संग्राम जाधव (रा. गिरीम, ता. दौंड) याच्या सांगण्यावरून चोरलेल्या वाळूची वाहतूक करीत असल्याचे सांगितले. कारवाईदरम्यान दुसरा ट्रकचा (क्र. एम.एच. १६, ए.ई. ५५११) चालक ट्रक सोडून पळून गेला आहे.

या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात काॅन्स्टेबल गणेश कडाळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चौघांविरूध्द भारतीय दंड विधान मधील कलम ३७९ (चोरी करणे), कलम १८८ (संचारबंदी आदेशाची अवज्ञा करणे), कलम २६९ व २७० (जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची आणि घातकी कृती करणे), महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना कायदा २०२० व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक, ट्रकमधील वाळू, असा एकूण १२ लाख ३० हजार रूपयांचा एेवज जप्त केला आहे. नवीन गार येथे ११ जून रोजी चोरलेल्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम.एच. १२ झेड.एफ. ३८१९) पोलिसांनी जप्त केला आहे. 

दौंड तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू असून, त्या दरम्यानही नदी पात्रांमधून राजरोस वाळू चोरी सुरू आहे. दौंड शहरासह सोनवडी, गिरीम, गार, नवीन गार, खोरवडी आणि तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात नदी पात्रातून वाळूची चोरी सुरू आहे.

कोणावर विश्वास ठेवावा?
महसूल व पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेले ट्रक वाळूसह दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) बंदिस्त आवारात उभे केलेले आहेत. परंतु, त्यामधील बहुतांश ट्रकमधील वाळू चोरीस गेल्याचे प्रकार घडले असून, त्याची अंतर्गत चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com