व्हॉट्सऍप स्टेट्स ठेवल्याने झालं असं काही...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

- पोलिसांनी केली कारवाई.

पिरंगुट : व्हॉट्सऍपवर धार्मिक तेढ निर्माण होईल, असे स्टेटस ठेवणाऱ्या तिघा तरुणांवर पौड पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या घटनांत हे गुन्हे दाखल केल्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या घटनेत पिरंगुट (ता.मुळशी) येथील शाहरुख इरफान खान (वय २२) या तरुणावर तर दुसऱ्या घटनेत कासार आंबोली येथील सुतारवाडीतील शुभम श्रीकांत सुतार (वय २१) आणि शिंदेवाडीतील ऋषिकेश राजेंद्र शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

उपनिरीक्षक अनिल लवटे यांच्या पथकातील हवालदार बाबा शिंदे, नामदेव मोरे, नाईक सागर बनसोडे व संतोष कुंभार आदी कर्मचारी गस्त घालत होते. त्यात पिरंगुट येथील शाहरुख शेख याने तसेच कासार आंबोली येथील सुतारवाडीतील शुभम सुतार व शिंदेवाडीतील ऋषिकेश शेडगे यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे मोबाईलचे व्हॉट्ऍपवर स्टेट्स ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या घटनांतील या तिघांवर गुन्हा 
दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अशोक धुमाळ म्हणाले, 'दोन समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल, असे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 
करून कठोर कारवाई केली जाईल'. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Taking Action against Peoples who set Objectionable Status on WhatsApp