Khadakwasla River : नदीपात्रात अंघोळ करून सेल्फी काढणाऱ्या तरुणांना पोलिसांचा धडा; खडकवासला धरणाच्या नदीपात्रात उतरू नये
Pune Police : खडकवासला धरणातून नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असताना काही तरुण नदीपात्रात उतरून अंघोळ आणि सेल्फी घेत होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही बेफिकिरी रोखली आणि तरुणांना चांगलाच धडा शिकविला.
खडकवासला : खडकवासला धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात मुठा नदीत पाणी सोडले जात आहे. या परिस्थितीत नदीपात्रात उतरणे म्हणजेच मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. तरीदेखील काही तरुण गुरुवारी सकाळी नदीपात्रात उतरत अंघोळ करीत सेल्फी काढत होते.