पुण्यातील पोलिस पोचले कब्रस्तानमध्ये अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

खडकीतील महादेववाडी येथील कब्रस्तानमध्ये जाऊन सर्व कबरींवर फुले वाहिली व खडकीकरांना खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले.

खडकी बाजार (पुणे) : देशात कोरोना विषाणूने कहर केला आहे. सध्या लॉकडाउन सुरू असल्याने सर्वधर्मीयांनी बाहेर न पडता घरात राहूनच सण साजरे करावे असे सरकारने आदेश जारी केला आहे. सोमवारी (ता. 25) मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद  ही घरात राहूनच साजरी करण्यात आली.

खवय्ये पुणेकरांनो, ऐकलंत का? आपलं `वैशाली` हाॅटेल सुरू झालयं

ईदच्या दिवशी नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये जाऊन त्यांच्या पूर्वजांच्या कबरींवर फुले वाहून आदरांजली वाहतात. मात्र, यावेळी लॉकडाउन आहे यासाठी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ व सहाययक पोलीस निरीक्षक हरीश ठाकूर यांनी स्वत: खडकीतील महादेववाडी येथील कब्रस्तानमध्ये जाऊन सर्व कबरींवर फुले वाहिली व खडकीकरांना खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य मनीष आनंद व खडकीतील मुस्लिम समाज बंधाव उपस्थित होते. खडकी पोलिसांनी खडकीत ईदनिमित्त मुस्लिम बांधवाना आवाहन केले होते. ईदला नमाज पठण इदगाह मैदानावर न करता प्रत्येकाने आपल्या घरातच नमाज पठण करावे पोलिसांच्या आवाहनाला खडकीतील मुस्लिम बांधवानी पूर्णपणे प्रतिसाद दिला व शांततेत ईद साधेपणाने साजरी करून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police went to the cemetery and laid flowers on all the graves in khadki pune