आयुक्तालयातील कामामुळे पोलिसांची बदलीसाठी धावाधाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

ग्रामीण व शहर पोलिस दलाच्या कामकाजाच्या पद्धतीत बदल आहे. येथील कामकाजाचा वेग अधिक आहे. या कामकाजाच्या पद्धतीशी जुळवून घेणे शक्‍य नसल्यास बदलीची मागणी केली जाते. यासह बदलीसाठी कौटुंबिक कारणेही असतात. 
- सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त

पिंपरी - नवीन पोलिस आयुक्तालयात काम करण्यास मिळेल या उमेदीने पिंपरी- चिंचवडमध्ये रुजू झालेले कर्मचारी आता पुन्हा मूळ ठिकाणी जाण्याची मागणी करत आहेत. तशा तब्बल ४५ जणांना ‘आपल्या गावाची आस’ लागली आहे. कामाचा ताण, पद्धत आणि वेग याच्याशी ताळमेळ न बसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस दलासह इतर जिल्ह्यांतील कर्मचारी येथे दाखल झाले. मात्र ग्रामीण व शहर पोलिस दलातील कामकाजाची बदलती कार्यपद्धती, कौटुंबिक कारणे यासह येथील अपुऱ्या मनुष्यबळामुळे येणारा कामाचा ताण यामुळे अनेक कर्मचारी पुन्हा पूर्वीच्याच जिल्ह्यात बदली मागत आहेत. त्यामुळे या पोलिसांची ‘गड्या, आपले पोलिस ठाणेच बरे’ अशी स्थिती झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 'दादागिरी’त कोणाचे प्राबल्य?

सध्या बाहेरील जिल्ह्यातून आलेले पाच जण बदलीने पुन्हा आपल्या जिल्ह्यात गेले असून, २१ जणांचे बदलीसाठीचे विनंती अर्ज दाखल झालेले आहेत. तसेच पुणे ग्रामीण दलातून आलेले तीन कर्मचारी मूळ ठिकाणी गेले असून, आणखी सहा जणांचे अर्ज दाखल आहेत. तर पुणे शहरातून आलेल्यांपैकी देखील १८ जणांचे बदलीसाठी अर्ज आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police work to fight for the transfer of commissioner