राजकीय-प्रशासन व्यवस्था एकत्र हवी - पोपटराव पवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

ज्या देशांना माती आणि पाणी नाही, असे जपान आणि सिंगापूर देश जगाला माती आणि पाण्याचे व्यवस्थापन शिकवतात. त्यामुळे आपण कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेने एकत्रित काम केल्यास प्रचंड मोठे परिवर्तन होते, असे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पुणे - ज्या देशांना माती आणि पाणी नाही, असे जपान आणि सिंगापूर देश जगाला माती आणि पाण्याचे व्यवस्थापन शिकवतात. त्यामुळे आपण कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेने एकत्रित काम केल्यास प्रचंड मोठे परिवर्तन होते, असे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शांतिदूत परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘शांतिरत्न’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात पवार बोलत होते. नगरसेविका आरती कोंढरे, भाजपचे माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, सूर्यदत्ता ग्रुपचे संजय चोरडिया, झील एज्युकेशन संस्थेचे जयेश काटकर, निवृत्त पोलिस अधिकारी विठ्ठल जाधव, विद्या जाधव, सुप्रिया बडवे, डॉ. मकरंद जावडेकर, स्वप्नील जोशी आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी मंगला शहा, डॉ. दामोदर पंत, रणजित शर्मा, श्रीकांत बडवे, केदार जाधव, युजवेंद्र महाजन, रवी कालरा, रघुनाथ येमूल, महेंद्रसिंह जडेजा, डॉ. पेट्रोनिलो बासा, पालमकुमार सुंदरम यांना ‘शांतिरत्न’ पुरस्काराने  गौरविण्यात आले.

पवार म्हणाले, ‘‘सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पुढच्या पंचवीस वर्षांत आपण कल्पना करणार नाही अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत. वेळीच या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. भूजल व्यवस्थापनात केलेल्या कामाबद्दल सरकारने ‘पद्मश्री’ सन्मान दिला. एका गावात केलेल्या कामाचा तो गौरव होता. त्या वेळी जमिनीखालच्या पाण्याला किती महत्त्व आहे, हे लक्षात आले.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political-administration system should be together says Popatrao Pawar

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: