संगीतखुर्चीपासून सुरू झालेल्या टीकेचा सूर पोचला संगीत बारीपर्यंत

प्रशांत चवरे
Wednesday, 10 June 2020

इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाल्या. संगीतखुर्चीपासून सुरू झालेल्या टीकेचा सूर संगीतबारीपर्यंत पोचला.  

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाल्या. संगीतखुर्चीपासून सुरू झालेल्या टीकेचा सूर संगीतबारीपर्यंत पोचला.  

भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनिता संतोष धवडे या बहुमताने निवडुन आल्या आहे. सरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सतरापैकी अकरा मते मिळवून त्यांनी विजय प्राप्त केला. राष्ट्रवादीचे तेरा सदस्य असताना राष्ट्रवादीच्या उमेद्वारास अकराच मते मिळाल्यामुळे दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टिकेची राळ उडविली.

भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा धवडे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी मकरंद तांबडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांनी बैठक घेण्यात आली. सरपंचपदासाठी अर्ज करण्याच्या निर्धारीत वेळेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन अनिता संतोष धवडे यांचा, तर विरोधकांकडून मुमताज जावेद शेख यांचे अर्ज आल्यामुळे निवडणुक घेण्यात आली. या वेळी झालेल्या निवडणुकीमध्ये अनिता धवडे यांनी सतरापैकी अकरा मते मिळवुन विजय प्राप्त केला, तर मुमताज शेख यांना सहा मते मिळाली. विरोधकांचे केवळ चार सदस्य असताना विरोधी उमेद्वारास सहा मते मिळाल्यामुळे सत्ताधाऱ्यांपैकी दोन सदस्यांची बंडखोरी झाल्याचे उघड झाले आहे.

पुणे- मुळशी प्रवास करताय? सावधान..

सरपंचपदाच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नूतन सरपंच धवडे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. महेश देवकाते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा सरचिटणीस शंकरराव गायकवाड, तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात, शहराध्यक्ष सचिन बोगावत, माजी सरपंच हेमाताई माडगे, महेश शेंडगे, प्रदीप वाकसे, अजिंक्य माडगे, संदीप वाकसे, प्रशांत शेलार, अमोल देवकाते, संतोष धवडे, गणेश राक्षे, रामहारी चोपडे, प्रभाकर जाडकर, आकाश उंडाळे, हेमंत निंबाळकर व सदस्य उपस्थित होते.

मोटार विहिरीत कोसळून महिलेसह दोन बालकांचा मृत्यू
    
या वेळी महेश देवकाते म्हणाले, संगीत बारी प्रेमींनी संगीत खुर्चीबाबत बोलू नये. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे व सर्वांना संधी मिळावी, या हेतूने राष्ट्रवादीच्या काही सदस्यांना सरपंच, उपसरपंचपदाची संधी दिली, मात्र त्याचा विकास कामांवर परिणाम होऊ दिला नाही. मागील साडेचार वर्षाच्या काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून विक्रमी विकासकामे झाली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

    
पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे व माजी सरपंच पराग जाधव म्हणाले की, सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी राज्यमंत्री, प्रदेश सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष यांना येऊन सदस्यांनी मनधरणी करावे लागते, हाच सत्ताधाऱ्यांचा पराभव आहे. सत्ताधाऱ्यांकडे तेरा सदस्य असताना पक्षाच्या अधिकृत उमेद्वारास अकरा मते मिळातात, याबाबत सत्ताधाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political developments for Bhigwan Sarpanch election