पुणे - महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता अद्याप जाहीर झालेली नसली, तरीही राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बहुतांश राजकीय पक्षांनी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे..महापालिकेच्या १६५ जागांसाठी अवघ्या दोन दिवसांतच विविध राजकीय पक्षांकडून सुमारे सुमारे तीन हजार अर्ज इच्छुकांनी घेतले आहेत. त्यापैकी आठशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज भरून तत्काळ पक्षाकडे जमा केले आहेत..विविध राजकीय पक्षांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज देण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून इच्छुकांना अर्ज देण्यास सुरवात झाली आहे.चारही पक्षांकडून आतापर्यंत २ हजार ८०४ इतके अर्ज इच्छुकांनी घेतले आहेत तर ८८२ इच्छुकांनी वेळ न दवडता तत्काळ पक्षाकडे अर्ज भरून दिले आहेत..अर्ज देण्यास सुरुवातकाँग्रेस - ९ डिसेंबररिपब्लिकन पक्ष (आठवले गट) - १० डिसेंबरशिवसेना - १२ डिसेंबरमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्ज देण्याबाबत बैठक होणार - ९ डिसेंबर .राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षपक्षाकडून पहिल्यांदा इच्छुकांना अर्ज वाटप करण्यात आली. पक्षाकडून आतापर्यंत ३५० हून अधिक इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. तर, २०५ जणांनी आतापर्यंत अर्ज भरून पक्ष कार्यालयात जमा केले असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.भारतीय जनता पक्षपक्षाने सोमवारपासून (ता. ८) इच्छुकांना अर्ज देण्यास सुरवात केली. मंगळवार (ता. ९) पर्यंत इच्छुकांना अर्ज दिले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी पक्षाकडून तब्बल २००० इच्छुकांनी अर्ज नेले. त्यानंतर ६०० जणांनी तत्काळ अर्ज भरून, पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. मंगळवारी अर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. पक्षाने इच्छुकांना निःशुल्क अर्ज दिले जात असल्याची माहिती पक्ष कार्यालयातून देण्यात आली..राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोमवारपासून (ता. ८) इच्छुकांना अर्ज देण्यास सुरवात झाली आहे. १८ डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज दिले जाणार आहेत. शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या हस्ते अर्ज देण्यास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी २०० इच्छुकांनी अर्ज घेतले असल्याची माहिती प्रसिद्धिप्रमुख बाबासाहेब पाटील यांनी दिली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षपक्षाकडून आतापर्यंत २५४ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. त्यापैकी ८० जणांनी पक्षाकडे अर्ज जमा केले असल्याची माहिती पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.