
पुणे - पुणे महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी निवडणूक आयोगाकडून आज रात्री देखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रभाग रचना शुक्रवारी (ता. २२) सकाळी जाहीर होण्याऐवजी सायंकाळी किंवा शनिवारी(ता.२३) जाहीर होईल अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. ४ सप्टेंबर पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत सूचना नोंदविता येणार आहेत.