पुणे : अशक्त प्रकृतीची व्यक्ती ट्रॅफीकमध्ये केवळ एक तासभर असताना जेवढी प्रदूषित हवा श्वासावाटे शरीरात घेते, ती हृदयविकार, मधुमेह किंवा अधिक कोलेस्ट्रॉल यामुळे असणाऱ्या जोखमीपेक्षा अधिक असते. हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या धोक्यांबाबत लोकजागृती आणि लोकसंवाद करणे अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी परिसर संस्थेने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मांडले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
इटली व तत्सम काही देशांतील घटनाक्रमामुळे हवा प्रदूषण आणि कोविड 19 पश्चात झालेले मृत्यू यांतील परस्परसंबंधांवर चर्चा व वायु प्रदूषणाचे मानव शरीरावर होणारे परिणाम लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये पलमोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन (पियूआरइ)) फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी आणि प्रयासच्या (आरोग्य गट) वरिष्ठ संशोधक डॉ. रितू परचुरे हे तज्ज्ञ सहभागी झाले होते.
या वेळी डॉ. संदीप साळवी यांनी आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट करत म्हणाले, "जगात 70% ऑक्सिजन पाण्यातील शेवाळ आणि 'सायनोबॅक्टेरिआ' यातून मिळतो आणि 30% झाडांपासून मिळतो. तर घरात वापरण्यात येणाऱ्या एक 'मॉस्किटो कॉईल' रात्रभर जाळल्याने होणारा धूर शरीरात घेणे शंभर सिगारेटी ओढण्यासारखे आहे. यापेक्षा अधिक घातक आहे धूपकांडी, जी केवळ 15 मिनिटे जळते पण त्यातून होणारे प्रदूषण 500 सिगारेटी ओढण्याइतके आहे. यासाठी घरात व घराबाहेर विविध प्रकारच्या वनस्पती व झाडे लावून प्रदूषण कमी करता येते." अशी अनेक रोचक व माहितीपर तथ्ये सादर करून त्यांनी प्रदूषणाचा पोटातील गर्भ आणि आबालवृदधांवर कसा प्रभाव पडतो हे ही डॉ. साळवी यांनी यावेळी सांगितले.
"लोक डाटा आणि तर्क यांआधारे नव्हे त्यांच्या मनातील आडायाच्या (मेंटल मॉडेल) आधारे धोक्याचे मोजमाप करून निर्णय घेतात. भीतीच्या पायावर उभे असलेले कोणतेही आरोग्यविषयक संप्रेषण केव्हाही उलटू शकते आणि अपेक्षित परिणाम साधत नाही. बहुतेक आजारांच्या जागृतीसाठी अशाच प्रकारे संप्रेषण केले जाते व कोविड-19 बाबतहेच होत असल्याचे चित्र आहे. आजारविषयक माहितीपेक्षा भीतीचा वरचष्मा असतो, तेव्हा लोक खरी जोखीम न समजून घेता प्रतिक्रियात्मक सावधगिरी बाळगायला प्रवृत्त होतात. यामुळे अपेक्षित जागरूकता वाढत नाही."
- डॉ. रितू परचुरे
जनजागृती आवश्यक
हवेची गुणवत्ता काशी असावी व त्यासाठी काय करता येईल याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर जनजागृती आणि अॅडव्होकसी करण्याच्या हेतूने येत्या वर्षात परिसरतर्फे विविध वेबिनारचे आयोजन केले जाणार आहे. पोलिस, शासकीय अधिकारी, नागरिक अशा विविध हितधारकांच्या दृष्टीने उपयुक्त विषय यामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. असे संस्थेच्या पार क्वालिटी अॅडव्होकसी ऑफिसर शर्मिला देव यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.