
पुणे विद्यापीठाने १५ मार्च पासून परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. सुमारे दीड महिना ही परीक्षा चालणार आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्रथम सत्र परीक्षेसाठीचे परिपत्रकच काढण्यास विलंब होत असताना आणखी एक मागणी समोर आली आहे. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राची परीक्षा एकत्र घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा अशी मागणी अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.
अधिसभा सदस्य डॉ. पंकज मणियार यांनी ही मागणी केली आहे. पुणे विद्यापीठाने १५ मार्च पासून परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. सुमारे दीड महिना ही परीक्षा चालणार आहे. त्यामुळे द्वितीय सत्र तेवढ्या कालावधीपर्यंत लांबणार आहे. द्वितीय सत्र सुरू होण्यासाठी मे महिना उजाडणार आहे, पण विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मेला शैक्षणिक वर्ष संपणार आहे. त्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी द्यावी लागेल. याचा विचार करता द्वितीय सत्र पुन्हा तीन चार महिन्यांनी संपणार आहे.
- स्टेडियमला नाव मोदींचं; बॉलिंग एंड अंबानी आणि अदानींचे!
पुणे विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेसाठी दीड महिना देण्यापेक्षा त्वरित द्वितीय सत्राचे वर्ग सुरू करावेत. त्यानंतर हा अभ्यासक्रम एप्रिल-मे महिन्यात संपण्यास पुढील दीड महिना परीक्षा घेता येईल. त्यामुळे २०२१-२२चे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करता येईल. विद्यार्थी, प्राध्यापक व विद्यापीठावर ताण येणार नाही अशी मागमी मणियार यांनी केली आहे.
- खडकवासला प्रकल्पात शहरासाठी यंदा पुरेसा पाणीसाठा
अधिसभेतही उपस्थित केला होता मुद्दा
मणियार यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या अधिसभेत देखील दोन्ही सत्राच्या परीक्षा एकत्र घ्यावा असा ठराव मांडला होता. यामध्ये प्रश्नपत्रिकेत प्रथम वर्षासाठी सेक्शन एक आणि द्वितीय सत्रासाठी सेक्शन दोन असे विभाग करून परीक्षा घेता येणे शक्य आहे असे सांगितले होते. मात्र, त्यावेळी देखील याकडे लक्ष देण्यात आलेले नव्हते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)