Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या वर्तणुकीबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट समोर, व्हॉट्सअ‍ॅट चॅटसह धक्कादायक माहिती

Pooja Khedkar news in marathi: पूजा खेडकर यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना जॉईन होण्यापूर्वी काही मेसेज केले होते. या मेसेजमध्ये पूजा यांनी जॉईन होण्यापूर्वीच कार आणि केबिनची मागणी केली होती.
Pooja Khedkar news
Pooja Khedkar news esakal

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केलेला रिपोर्ट आता समोर आलाय. या रिपोर्टमध्ये खेडकर यांच्या वर्तणुकीची पुराव्यांसह माहिती देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पूजा यांनी निवासी जिल्हाकाऱ्यांशी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे डिटेल्सही जोडण्यात आले आहेत.

रिपोर्टमध्ये काय आहे?

पूजा खेडकर यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना जॉईन होण्यापूर्वी काही मेसेज केले होते. या मेसेजमध्ये पूजा यांनी जॉईन होण्यापूर्वीच कार आणि केबिनची मागणी केली होती. यावर जॉईन झाल्यावर निर्णय घेऊ असे उत्तर निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र त्यावर समाधानी न होता हे आधी व्हायला हवे अशी पूजा यांची मागणी होती.

याशिवाय या अहवालात पूजा यांच्या वर्तणुकीबाबतची माहिती देण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमधले सामान बाहेर काढून त्यांनी स्वतंत्र टेबल, संगणक, नावाची पाटी आणि इतर सामान ठेवण्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. शिवाय फोटोही जोडलेले आहेत. त्यामुळे खासगी गाडीला लाल दिवा लावणे, आरक्षणाचा नियमबाह्य लाभ घेणे यासोबतच प्रशिक्षण काळातील वर्तणुकीवरूनही पूजा खेडकर अडचणीत येणार आहेत.

पूजा खेडकर, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी, यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होण्यापूर्वीच निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांना व्हॉट्सअॅपद्वारे स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान व शिपाई याबाबत वारंवार मागणी केली होती.

विनंती आणि अटींचा वाढता आग्रह

खेडकर यांनी दिनांक ३ जून २०२४ रोजी रुजू झाल्यानंतर लगेचच स्वतंत्र सुविधांची मागणी सुरू केली. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन, गाडी व शिपाई यांची सुविधा अनुज्ञेय नसतानाही त्यांनी या गोष्टींबाबत आग्रह धरला. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमध्ये प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देऊनही त्यांनी आपल्या मागण्या न सोडता अधिक सोयीसुविधांच्या मागणीवर ठाम राहिल्या.

स्वतंत्र बैठकीसाठी आग्रह

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात बैठक व्यवस्थेची तपासणी करताना, त्यांनी स्वतंत्र बाथरूमसह VIP सभागृहाची मागणी केली. त्यांच्या विनंतीनुसार, दिनांक १२ जून २०२४ रोजी त्यांच्या सेवेसाठी खास सभागृहाची व्यवस्था केली. मात्र, जुन्या इलेक्ट्रीक फिटींग्जच्या बाबतीत त्यांचा आग्रह न सोडता त्यांनी सभागृह नाकारले.

अधिकारी आणि त्यांच्या वडिलांची अशोभनीय वर्तणूक-

खेडकर यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या अॅन्टीचेंबरची व्यवस्था करून घेतली. या काळात त्यांनी ऑफिसचे सामान बाहेर काढून आपल्या सोयीप्रमाणे नवीन सामानाची मागणी केली. त्यांच्या वडिलांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना धमक्या दिल्या.

प्रशासनाच्या उपाययोजना

दिनांक २१ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर केला आणि आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश दिले. खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी १४ जून रोजी संपला असून पुढील प्रशिक्षण इतर कार्यालयात घेण्याची सूचना दिली आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना समुपदेशन करून अधिकाऱ्यांचे कर्तव्य महत्त्वाचे असल्याचे पटवून दिले.

पूजा खेडकर यांची वर्तणूक प्रशासकीय अधिकाऱ्यास शोभेल अशी नाही. त्यांनी अवास्तव मागण्या करून आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्या वडिलांची वर्तणूक देखील आक्षेपार्ह असून प्रशासनाने याबाबत योग्य ती कारवाई करावी असा अहवाल सादर केला आहे.

Pooja Khedkar news
Manoj Jarange Patil: आता चूक नाही, विधानसभेत उलटं पाडण्याचा जरांगेंचा इशारा! आठ दिवसात नाव सांगणार; सत्ताधारी टेन्शनमध्ये?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com