

Pooja Khedkar House Robbery Raises Security Concerns
Esakal
बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिच्या घरी काम करणाऱ्या नेपाळी नोकरानं चोरी केल्याची घटना घडलीय. बाणेर रोड परिसरात शनिवारी रात्री ही चोरीची घटना घडली. पूजा खेडकरनं पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, घरात काम करणाऱ्या एका नोकरानेच आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं आणि मला बांधून घातलं. यानंतर घरात चोरी करण्यात आली. चोरट्यानं सर्वांचे फोन चोरी केले आहेत.