
Pooja Khedkar
esakal
पुजा खेडकर आणि तिच्या कुटुंबीयांच्या नावावर आणखी एका वादाची भर पडली आहे. नवी मुंबईतील मुलुंड-ऐरोली मार्गावर झालेल्या अपघातानंतर अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार हा पुजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी आढळून आला. या घटनेने खेडकर कुटुंबाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली असून, नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.