

Poor Conditions at Yerawada Hospital
Esakal
पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांकडून स्वच्छतेची कामं करुन घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीने समोर आणला होता. या बातमीची दखल प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांनी आणि आरोग्य उपसंचालकांनी घेतली आहे. रुग्णालय अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. तर उपसंचालकांनीही दोषी असलेल्यांवर कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या असून कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलंय. दरम्यान , आरोग्य उपसंचालकांनी येरवडा मनोरुग्णलायची पाहणी केली असता भीषण वास्तव दिसून आलंय. स्वच्छतागृहात अस्वच्छता, उग्र वास आणि ड्रेनेज ब्लॉक झाल्याचा प्रकार उघड झालाय. Inspection reveals unhygienic wards and issues at Pune mental hospital