

Chaos at Iconic Pune Auditorium: Performance Cancelled Amid Severe Technical Issues
sakal
-महिमा ठोंबरे
पुणे: टिळक स्मारक मंदिर नाट्यगृहात प्रयोग सुरू झाल्यावर कलाकारांचे आवाजच पोहचत नसल्याने आणि उकाड्याने सारे हैराण झाल्यामुळे अवघ्या दहा मिनिटांत नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची नामुष्की शनिवारी (ता. ९) ओढवली. नाट्यगृहातील अवव्यस्थेने कळस गाठल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला.