पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात दहा आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार आहे. गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी याबाबत बुधवारी (ता.४) न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी मंजूर केला आहे.