
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) पुण्यात सुरू होण्याच्या मागणीबाबत आता सकारात्मक चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या १५ दिवसांत याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून सरन्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी येथील खंडपीठाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे वकील आणि पक्षकारांमध्ये खंडपीठाची आशा पल्लवीत झाली आहे.