
खडकवासला धरण प्रकल्पात केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा असल्याने व पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने ४ जुलैपासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला.
पुणे शहराची पाणी कपात रद्द होण्याची शक्यता
पुणे - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. हा निर्णय सोमवारी (ता. ११) होण्याची शक्यता आहे.
खडकवासला धरण प्रकल्पात केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा असल्याने व पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने ४ जुलैपासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पावसालाही सुरवात झाल्याने धरणातील पाणी साठा वाढत आहे. ही पाणी कपात ११ जुलैपर्यंत ठेवण्यात येणार होती, पण आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण रविवारी (ता. १०) असल्याने महापालिकेने ८ ते ११ जुलै या काळात पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला. ११ जुलै नंतरचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाईल असे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते.
शनिवारी (ता. ९) सायंकाळपर्यंत खडकवासला धरण प्रकल्पात सात टीएमसी पाणी साठा आहे. पुढील ११ जुलै पर्यंत हा पाणीसाठा किमान दोन ते तीन टीएमसी पाणी वाढण्याची शक्यता आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पुरेसे पाणी जमा झाल्याने मंगळवारपासूनही शहरात नियमात पाणी पुरवठा करणे शक्य आहे.
याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी वाढली आहेत त्यादृष्टीने पुढील निर्णय घेतला जाईल.
Web Title: Possibility Of Cancellation Of Water Cut In Pune City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..