पुण्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता

गेल्या आठवड्याभरापासून किमान तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर मंगळवारी शहर परिसरातील किमान तापमानात काहीशी घट झाली.
Temperature
TemperatureSakal
Updated on
Summary

गेल्या आठवड्याभरापासून किमान तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर मंगळवारी शहर परिसरातील किमान तापमानात काहीशी घट झाली.

पुणे - शहर परिसरात सध्या उन्हाचा (Summer) चटका अधिक जाणवू लागला आहे. पुढील आठवडाभर किमान तापमानात (Temperature) चढ-उतार कायम होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तवली आहे.

गेल्या आठवड्याभरापासून किमान तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर मंगळवारी शहर परिसरातील किमान तापमानात काहीशी घट झाली. शहरात ११.५ अंश सेल्सिअस, तर लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात किंचित घट झाली होती. पुढील दोन दिवस शहरात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता असून कमाल व किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे.

Temperature
पुणे जिल्ह्यात मंगळवारी ६८७ नवे कोरोना रुग्ण; ६ रुग्णांचा मृत्यू

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, थंडी कमी होऊ लागली आहे. दरम्यान विदर्भात काही ठिकाणी अद्याप गारठा कायम आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान तिशी पार पोहोचले आहे. राज्यात पुढील तीन दिवस ही स्थिती अशीच कायम राहणार असून त्यानंतर किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला.

राज्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ तर विदर्भात काहीशी घट पाहायला मिळाली. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर नीचांकी तापमानाची नोंद नाशिक येथे ११.४ अंश सेल्सिअस इतके होते.

बंगालच्या उपसागरात ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तमिळनाडू, केरळ लक्षद्वीप बेट समुहावर दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अंदमान बेटांजवळ हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्याने या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com