सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सहकार व पणन विभागाने दिले आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 September 2020

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी 18 मार्च आणि 17 जूनच्या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आल्या होत्या

पुणे -  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सहकार व पणन विभागाच्या वतीने सोमवारी (ता. 28) जारी करण्यात आले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी 18 मार्च आणि 17 जूनच्या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोना साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही. या निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या सहकारी संस्थांव्यतिरिक्त इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत घेता येणार नाहीत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the postponement of elections to cooperatives