कोथरूडमध्ये कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

कोथरूड - सायन्स ॲड टेक्‍नॉलॉजी पार्क पुणे यांच्यातर्फे केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘निधी प्रयास’ या योजनेतून द पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड गर्ल्समध्ये कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोथरूड - सायन्स ॲड टेक्‍नॉलॉजी पार्क पुणे यांच्यातर्फे केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘निधी प्रयास’ या योजनेतून द पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड गर्ल्समध्ये कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सायन्स ॲड टेक्‍नॉलॉजी पार्क’चे अध्यक्ष डॉ. दिलीप बंड यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, जीडी एन्व्हायर्न्मेंट कंपनीचे अजित गाडगीळ, अभिजित दातार, प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, योगिनी जती (जव्हेरी), मुख्याध्यापक राजाराम जगताप उपस्थित होते. वर्षा रांका यांनी  सूत्रसंचालन केले. 

या प्रकल्पाविषयी बोलताना गाडगीळ म्हणाले, ‘‘गॅसिफायर तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही हे यंत्र बनवले आहे. यामध्ये साधारण २६ किलो कचऱ्यामध्ये दीड तासात पाचशे लिटर पाणी ७५ डिग्री इतके गरम होते. यामुळे येथील सर्व प्रकारचा सुका कचरा विघटित होतो. फक्त तीन टक्के राख राहते. तिचा वापर विटा बनविण्यासाठी होऊ शकतो. साधारणतः तासाला २०० वॉट वीज खर्च होते. म्हणजे आजच्या वीज दराप्रमाणे फक्त दोन रुपये खर्च येतो. अंधशाळेत ओल्या कचऱ्याच्या विघटनासाठी बायोगॅस प्रकल्प आहे. नवीन प्रकल्पामुळे सुक्‍या कचऱ्याचा प्रश्न सुटला आहे.’’

डॉ. जगदाळे म्हणाले, ‘‘अशा प्रकारचा प्रकल्प हा भारतातील पहिला प्रकल्प आहे. यासारख्या प्रकल्पातून छोट्या बंगल्यापासून मोठ्या शहरापर्यंतची कचऱ्याची समस्या आपण सोडवू शकतो. यातून कोणतेही प्रदूषण होत नाही. हे तंत्रज्ञान पूर्णतः भारतीय असून पुण्यात विकसित झालेले आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power generation from Waste in kothrud