Pune News : कोथरूडच्या शास्त्रीनगरमध्ये १७ तास बत्ती गुल!

कोथरूडच्या शास्त्रीनगरमधील स्वामी समर्थ मठाजवळील परिसर, सागर कॉलनीचा काही भाग येथील वीज पहाटे दोनपासून गेली.
power outage for 17 hours in Shastri Nagar of Kothrud pune msedcl mseb
power outage for 17 hours in Shastri Nagar of Kothrud pune msedcl mseb esakal

कोथरूड : ‘आम्ही अशा स्मार्ट सिटीमध्ये राहत आहोत की, जेथे लोकांना विजेवाचून १७ तास राहावे लागत आहे. अजूनही आमच्याकडे वीज आलेली नाही. हा एक विक्रम होईल’, अशी संतप्त प्रतिक्रिया महेश दिवाणे यांनी दिली.

कोथरूडच्या शास्त्रीनगरमधील स्वामी समर्थ मठाजवळील परिसर, सागर कॉलनीचा काही भाग येथील वीज पहाटे दोनपासून गेली. संध्याकाळी सहा वाजले तरी वीज न आल्याने लोकांचा संताप वाढला.

किराणा दुकानदार संजय शहा म्हणाले की, वीज नसल्याने फ्रीजमधील दुग्धजन्य पदार्थांचे नुकसान झाले. मागील आठवड्यात शुक्रवारी अशाच पद्धतीने वीज गेली होती. तक्रार करून कंटाळलो आहोत.

अनिता कदम (गृहिणी) म्हणाल्या की, वीज नसल्याने महिलांना खूप त्रास झाला. मिक्सर, वॉशिंग मशिन, विजेचा पंप वापरता आला नाही. त्यामुळे स्वयंपाक, पाणी, इस्त्री, धुणे यांसारखी कामे खोळंबली. पंखा लावता न आल्याने डासांचा उपद्रव सहन करावा लागला.

निधीअभावी रखडले काम

भूमिगत वीजवाहिन्यांची गरज असून, निधीअभावी ते काम रखडले आहे. भुसारी कॉलनी, बावधन, महात्मा सोसायटी परिसर, सुतारदरा, केळेवाडी आदी झोपडपट्टी परिसरातील काही भागांत भूमिगत वाहिन्यांचे जाळे निर्माण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अनेकदा वीज जाण्याचे प्रसंग घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

वीजवाहिनीत दोष असल्याने ती नवीन टाकावी लागली. या वाहिन्यांमध्ये झाडांच्या मुळ्यांचा अडथळा येत होता. त्यामुळे दुरुस्तीस विलंब झाला.

— राजेश काळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com