
पुणे : प्रयोग ऐन रंगात आलेला...कलाकार आणि रसिक नाटकाशी समरस झालेले अन् तितक्यात नाट्यगृहातील ‘बत्ती गुल’ होते...हे केवळ एकदा नाही, दोनदा नाही तर एकाच प्रयोगात तब्बल पाच ते सहा वेळा घडले. कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटकाच्या प्रयोगादरम्यान असा प्रकार वारंवार घडल्याने कलाकार आणि रसिकांचा रसभंग झाला.