पुण्यात पावसाचा वीजपुरवठा यंत्रणेला 'शाॅक'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

शहर व उपनगरात अनेक ठिकाणी पुरवठा विस्कळित 

पुणे : दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शहर व उपनगराच्या परिसरात अनेक भागातील वीजपुरवठ्याला बसला. केबलमध्ये पाणी शिरणे, विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडणे, फिडर पिलर्स बंद पडणे असे प्रकार झाल्याने विस्कळित झाल्याच्या तक्रारी महावितरणकडे मोठ्या प्रमाणावर आल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठवड्यात शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा आणि वाऱ्याच्या वेगाने अनेक ठिकाणी झाडे आणि झाड्याच्या फांद्या पडण्याचे प्रकार घडले. तर रस्त्यांना ओढ्याच्या स्वरूप आले होते. या सर्वांचा फटका शहराच्या वीज यंत्रणेला बसला. विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने, तर काही ठिकाणी भूमिगत केबलमध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

महावितरकडून दरवर्षी पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आपत्कालीन व्यवस्था म्हणून महावितरणाला देखभाल दुरुस्तीची परवानगी देण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे ही काम करण्यात अनेक अडचणी आल्या. 

 

मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या. तक्रार आल्यानंतर युद्धपातळीवर वीज पुरवठा दुरुस्तीचे कामे करण्यात आली. सध्या शहरात सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे. 
-निशिकांत राऊत (जनसंपर्क अधिकारी, महावितरण) 

 

मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात ऐन दुपारी वीज पुरवठा खंडित झाला. सायंकाळी सात वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे सर्व काम विस्कळित झाले होते. 
सलिल तागुंदे ( मोहननगर, धनकवडी) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power supply disrupted in many places in Pune city and suburbs