Mahindra Showroom : ‘महिंद्रा’ची पुण्यात दोन नवी दालने; ‘पीपीएस मोटर्स’चा महाराष्ट्रात विस्तार

Pune Auto News : पीपीएस मोटर्सने पुण्यात कात्रज व सासवड येथे महिंद्राची दोन नवीन दालने सुरू करून विक्री व सेवांचा विस्तार केला आहे.
Mahindra Showroom
Mahindra ShowroomSakal
Updated on

पुणे : देशातील सर्वांत मोठ्या वाहन वितरक समूहांपैकी एक असलेल्या पीपीएस मोटर्स कंपनीने येथे ‘महिंद्रा’ची दोन नवी दालने सुरू केली आहेत. कात्रज येथील दालनाचे उद्घाटन ‘महिंद्रा’चे राष्ट्रीय विक्रीप्रमुख व उपाध्यक्ष बाणेश्वर बॅनर्जी आणि ‘महिंद्रा’च्या ईव्ही व्यवसायाचे प्रमुख दीपक सिन्हा यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर कंपनीने सासवड येथेही आणखी एक नवे दालन सुरू केले आहे. यामुळे ‘पीपीएस मोटर्स’च्या पुण्यात ‘महिंद्रा’ची सात दालने आणि एक सेवा केंद्र अशी एकूण आठ केंद्रे झाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com