पुणे - ‘स्पर्धा परीक्षांमधील यश सरावाशिवाय मिळू शकत नाही. नियमित सराव केल्यामुळेच या परीक्षेत यश प्राप्त करता येते,’ असे प्रतिपादन ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी केले. यासाठी ‘स्टडीरूम’ ही उत्कृष्ट कल्पना आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय नागरी सेवांमध्ये मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या ‘सकाळ प्लस स्टडीरूम’ या कल्पनेचे त्यांनी कौतुक केले.